अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर सावंगी (मेघे) पोलिसांची कारवाई

१ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : पोलिसांनी अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर सावंगी (मेघे) पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी एक लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सावंगी (मेघे) पोलिसांनी पालोती रोड सावंगी (मेघे) रोडवर नाकाबंदी केली. यावेळी सावंगी चौकाकडून येत असलेल्या युवकास थांबवून विचारपूस करण्यात आली. त्याने प्रणय विशाल सुटे (वय २४) रा. सालोड (हिरापूर) असे नाव सांगितले. त्याच्या ताब्यातील एम एच १२ यु एच ४२६१ दुचाकीची डिक्कीची तपासणी केली असता दारूसाठा मिळाला.

पोलिसांनी दारूसाठा, दुचाकी असा १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रणय विशाल सुटे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, अभय खोब्रागडे, श्याम सलामे, गौरव नरताम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *