या दिव्यांगांचे रुग्णालयासमोर दुकान होते. ते दुकान नगर परिषदेच्यावतीने जेसीबी चालवून उद्ध्वस्त करण्यात आल्याने त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. अनेकांकडून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे विनंती अर्ज केले. तत्कालीन जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांनी दुकान लावण्यास सन्मती दिली होती. तरीही नगर परिषद यांचे दुकान उद्ध्वस्त करीत आहे.
अनेक अडचणी या दिव्यांगांपुढे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अमजद पठाण यांनी केली आहे. अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असेही स्पष्ट केले.