शेतकऱ्यांनी आधुनिक शेती सोबतच सामूहिक शेती देखील करावी : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व कार्यशाळा कालवे वितरण प्रणाली दुरुस्ती व नुतनीकरण कामाचे भूमीपूजन

वर्धा (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सामूहिक गट शेती तसेच कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करावेत. यासाठी पोकरा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथे नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मान करण्यासाठी बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच पाठबंधारे विभागाच्यावतीने बोर व धाम प्रकल्पवरील कालवाच्या वितरण प्रणालीची दुरुस्ती व नुतनीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार डॉ.मनिशा कायंदे, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ?ड सुधीर कोठारी, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, तहसिलदार शकुंतला पाराजे, राजेशसराफ, अशोकक्लोडे, अशोक मुंडे, सहाय्यक अभियंता सतीश मोवाडे, घोराडच्या माजी सरपंच ज्योती धंगारे आदी उपस्थित होते.

उभा राहत नाही, तोपर्यंत आधुनिक भारताचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. शेतकरी आत्मनिर्भर व समृद्ध व्हावा यासाठी शासनाच्यावतीने किसान सन्मान योजना, बळीराजा पांदन रस्ते योजना, बळीराजा मोफत बीज योजना आदी योजनांसोबतच विविध अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध कसे करता येईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण शेती केल्यामुळे त्यांचा सन्मान राज्यस्तरवर झाला. त्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करून फळ, भाजीपालालागवड करावी, असे पालकमंत्री म्हणाले.

राज्यात प्रथमच दुरुस्तीच्या कामासाठी २८४ कोटी मंजूर
सेलू तालुक्यातील बोर व धाम प्रकल्पाचे कालवे वितरण प्रणाली ४० वर्ष जुनी असल्याने दोषपूर्ण झाली होती. त्यामुळे कालվयातून बरेचशे पाणी पाझरमुळे वाया जात होते. यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर कमी पाणी पाहोचत असल्याने सिंचन क्षमता कमी झाली होती. बोर प्रकल्पातील कालवा प्रणाली दुरुस्तीसाठी १४८ कोटी व धाम प्रकल्पातील कालवा वितरण प्रणाली दुरुस्तीसाठी १३६ कोटी असे २४८ कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालवा दुरुस्तीच्या कामासाठी मंजूर केलेले आहे.

या कामामुळे बोर प्रकल्पातील ७३ गावे व धाम प्रकल्पामुळे ४८ गावांना लाभ मिळणार आहे. बोर प्रकल्पातील १२ हजार १९४ हेक्टर क्षेत्र व धाम प्रकल्पातील ६ हजार ९० हेक्टर क्षेत्र सिंचन पुनःस्थापित होणार असल्याने सेलू, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत सिंचनासाठी लाभ घेऊन त्यांना सुगीचे दिवस येईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.

युवा शेतकरी शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेती करीत आहे. अशा शेतकऱ्यांचा सन्मान ही आनंदाची बाब आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये महिला शेतकरी सन्मान विधेयक पारीत झाले असून यामुळे महिला शेतकऱ्यांना सन्मान मिळणार असल्याचे आ.कायंदे म्हणाल्या.

यावेळी सुधीर कोठारी, उमेश घाडगे, अशोक कलोडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्सवरांच्याहस्ते फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, रेशीम शेती करणाऱ्या तसेच तेल युनिट उभे करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकअरविंदउपरीकरयांनीकेले.

तत्पूर्वी बोर प्रकल्पजवळलील कालवा वितरण प्रणालीचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी भूमीपूजन व बोर प्रकल्प परिसर पर्यटनसाठी लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण तसेच केळी उत्पादक शेतक-यांच्या अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *