वर्धा जिल्ह्यात ६७ रुग्णांना सुमारे ६३.४० लाखांची मदत

वर्धा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ रुग्णांना सुमारे ६३ लाख ४० हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जांचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *