सक्ती रद्द करण्याची मागणीराष्ट्रपतींना पाठविण्यात आले निवेदन
वर्धा – केंद्र व राज्य शासनाने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेची सक्ती केली आहे. ही सक्ती अन्यायकारक असून अनेक शिक्षक सेलू निवृत्ती अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहे. अशा शिक्षकांनाही ह्या अटी लादण्यात आल्याने शिक्षकांत असंतोष पसरला असून आज प्रहार शिक्षक संघटनेसह अनेक शिक्षक संघटनांनी छत्रपती शिवाजी चौकात दंडवत आंदोलन करीत या शासन निर्णयाचा निषेध केला. टीईटी सक्तीचा निषेध करीत प्रहार शिक्षक संघटनेचे अजय भोयर, शिक्षक संघटनेचे नेते विजय कोंबे यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. २०२३ पुर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना टीईटी मधून सुट देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा शासनाने विचार करावा. अशी मागणी प्रहार शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहे.