सत्तेत येण्याकरीता शेतकऱ्यांना दिलेल्या एका तरी आश्वासनाची भाजपा सरकारने पुर्तता करावी

खासदार अमर काळे यांची मागणी

वर्धा  : मतदार संघात दौऱ्यावर असताना खासदार अमर काळे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचारले असता खासदार अमर काळे यांनी सडेतोड उत्तर देऊन भारतीय जनता पक्षाने २०१८ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरकार आल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव तर नाहीच नाही पण हमीभाव सुद्धा मिळत नसल्याने खासदार अमर काळे यांनी भारतीय जनता पक्षाने २०१८ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंवा इतर जी आश्वासने दिली होती त्यातील एक तरी आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली.

खासदार अमर शरदराव काळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, पी.एम. किसान सारख्या तकलादू योजनांमधून किंवा अशाच वेगवेगळ्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केल्याचे दर्शवून हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पी.एम. किसान सारख्या योजनेमधून केंद्र व राज्य सरकार द्वारे १२,००० रु. दिले जातात. या १२,००० रुपयात शेतकऱ्याने संपूर्ण वर्ष कसे जगावे हा साधा प्रश्न ‘भाजपा सरकारला किंवा त्यांचे सरकार सोबत असलेल्या तज्ञ मंडळींना पडू नये हे एक कोडेच आहे. खासदार अमर काळे यांच्या मते शेतकऱ्यांना पी.एम. किसान सारख्या योजनांमधून तसेच वेळोवेळी कर्जमाफीची घोषणा करून केवळ बँकांचे चांगलं करायचं हे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पी.एम. किसान नको, कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना द्यायचेच असेल तर आपण २०१८ ला दिलेल्या आश्वासनानुसार त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. ही तकलादू मदत करून शेतकऱ्यांना उपाशी ठेवायचे नाही व पूर्ण जेबायलाही द्यायचे नाही. अशा पध्दतीचे सरकारने हे धोरण बंद करून खरोखरच शेतकऱ्यांच्या मनापासून कळवळा असेल तर त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार किंवा २०१८ ला जी आपण सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना मोठमोठा आश्वासने दिली होती त्यातील फक्त एक उत्पादन खर्चावर आधारित भाव एवढीच मागणी शेतकऱ्यांची पूर्ण करावी. शेतकऱ्यांची एवढी मागणी जरी या सरकारने पूर्ण केली तरी आपल्या देशातील शेतकऱ्यांना वेगळी मदत करायची गरज पडणार नाही. वेळोवेळी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही एवढीच अपेक्षा खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली.

बेरोजगारांच्या बाबतीत सुद्धा खासदार अमर काळे यांनी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. आज वस्तुस्थिती काय आहे हे आपण त्या मुलांचे आईवडील म्हणून किंवा ते युवक प्रत्यक्ष पाहत आहेत. या सरकारने युवकांना रोजगार तर दिला नाहीच उलट जे युवक आपला छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होते, आपले कुटुंब जगवत होते त्या युवकांना बेरोजगार करण्याचे काम मात्र या सरकारने निश्चित केले. सन २०१८ मध्ये यावेळी आपण निवडणुकीमध्ये २ कोटी रोजगारांचे आश्वासन दिले होते त्यातील २ कोटी रोजगारांची निर्मित करण्यात बेरोजगारचा रोजगार कमी करण्याचे काम या सरकारने केलेले आहे. २०१८ ला जो युवक २५ वर्षा वयाचा होता तो आज ३७ वर्षाचा झालेला आहे. त्यामुळे रोजगारा अभावी या देशाची संपूर्ण एक पिढी या सरकारच्या काळात देशोधडीला लागलेली आहे. ३७ वर्षांचा युवक आज कुठलाही रोजगार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे या सरकारने बेरोजगारांना २ कोटी रोजगार निर्मित करण्याचे दिलेले आश्वासनही अवत बिरलेले आहे. आजच्या युवकाने या सरकारची रणनीती ओळखून वेळीच सावध होणे गरजेचे आहे असेही खासदार अमर काळे यांनी सांगितले. २०१८ च्या निवडणुकीचे वेळी या भाजपा ने लोकांना जी आश्वासने दिली होती त्यातील एक तरी आश्वासन पूर्ण करावे असे खासदार अमर काळे यांनी आवाहन केले.

वरुड तालुक्यात नुकताच घोषित करण्यात आलेले महेंद्री अभयारण्याबाबत बोलताना खासदार अमर काळे यांनी सांगितले की मी महेंद्री अभयारण्यासंदर्भात दोन सभा घेतल्या त्या सभेत बऱ्याच शेतकऱ्यांनी या अभयारण्याबाबत सहमती दर्शविली. काही शेतकऱ्यांनी सरकार कडून काही अडचणी सांगून त्या सोडवल्यास आमचीही सहमती आहे असे सांगितले होते. खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन याबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना या संदर्भात पत्र सुद्धा दिले आहे. उलट यानंतरच्या वरुड दौऱ्यात खासदार अमर काळे यांना काही लोकांनी भेटून या अभयारण्याला आपला विरोध दर्शविला, याबाबत खासदार अमर काळे यांनी आपली भुमिका स्पष्ट करत सांगितले की ज्यांची सहमती आहे ते बऱ्याच असहमती आहे ते यांची एकत्र बैठक घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेऊन याबाबत योग्य तो तोडगा काढून शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन व यातून मार्ग काढण्यात येईल असाही आशावाद खासदार अमर काळे यांनी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *