दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा – जिल्हाधिकारी वान्मथी सी.

वर्धा (जिमाका) : दिव्यांग व्यक्तीला जीवन जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापुढे आव्हान असते. दिव्यांगांसाठी शासन अनेक योजना राबवते. या योजनांचा लाभ व त्यांचे हक्क मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेऊन कामे करा, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न
करा, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मधी सी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *