राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाख ३५ हजार रुपयाच्या गावठी दारुसह मुद्देमाल जप्त

वर्धा (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्ह्याचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी ठिकठिकाणी गावठी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच बनावट मद्य निर्मिती विरोधात केलेल्या धडक कारवाईत २० गुन्हे नोंदविले असून १० आरोपीस अटक केली. अवैध दारू निर्मिती करीता वापरण्यात येणारे १० हजार १८० लिटर रसायन, विदेशी ८ लिटर दारु व १९२ लिटर गावठी दारु असा एकुण ४ लाख ३५ हजार १५२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे येथे झालेल्या विषारी दारुकांडामुळे अनेक जणांना प्राणास मुकावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या सक्तीच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई भरारी पथकाचे निरिक्षक एम. एम. शेख यांच्या नेतृत्वात दुय्यम निरिक्षक डी. वाय. राऊत, आर. यु. काष्ठे व जवान अमित नागमोते, योगेश गावंडे, गिरीश बावने, सुजाता भारस्कर यांनी केली. अवैध दारू व्यवसायी माहिती कोणास असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक एम. ए. शेख यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *