समुद्रपूर पोलिसांची कारवाई
समुद्रपूर : जाम-हिंगणघाट सर्व्हिस रोडवर गाडी उभी करून पानटपरीवर गेला असताना त्यांच्या मालकीची पल्सर गाडी कोणी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. परत आल्यावर गाडी न दिसल्याने फिर्यादीने गाडीचा शोध घेतला. गाडी न मिळाल्याने आकाश हेमराज कारमोरे यांनी समुद्रपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य घेऊन समुद्रपूर पोलिसांनी चक्र फिरवले. समुद्रपूर पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी हा पाईकमारी गावाजवळ फिरत असल्याचे. माहिती मिळाली. सापळा रचून गाडीसह आरोपी भूषण पंजाब उईके राहणार हिंगणा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ८० हजार रुपयाची पल्सर गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिपक वानखेडे, एएसआय रामदास चकोले, पोलिस हवालदार प्रकाश मेंद, कपिल मेश्राम, पोलिस अंमलदार संजय वानखेडे यांनी केली.