सावंगी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर देणार हिंगणीच्या पीएचसी मध्ये सेवा

पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या पुढाकारातून हिंगणी वासियांना मिळणार सुविधा

वर्धा. सेलू तालुक्यातील दुर्गम व जंगलव्याप्त परिसरातील हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सावंगी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर रूग्णांना सेवा देणार आहे. तसे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई ने दिले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे हिंगणी परिसरातील रूग्णांना ही सेवा मिळणार आहे.

राष्ट्रीय वैद्यक आयोग नवी दिल्ली यांच्या 19 सप्टेंबर 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्य शासनाने दिनांक 23 ऑगष्ट 2021 रोजी शासन आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयातील वै्रकीय पदव्युत्तर पदवी (एमडी/एमएस) अभ्याक्रमांच्या विधाथ्र्यांकरिता जिल्हा निवासी कार्यक्रमातंर्गत ही सेवा हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दयावी लागणार आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या भगिरथ प्रयत्नामुळे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातून हिंगणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी पीएचसी येथे साकार झाली आहे.

हिंगणी व लगतचया परिसर बोर टायगर रिजर्वला लागून असल्याने येथे आरोग्य सुविधांची अत्यंत निकड होती. त्यामुळे या केंद्राला विशेष महत्व आहे. हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत जनरल मेडिसीन, स्त्रीरोग, जनरल सर्जरी, अस्थिरोग, बालरोग या विभागातील पदव्युत्तर विधार्थी यांची प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणी येथे पदस्थापना करण्याबाबत तसेच जिल्हा निवासी कार्यक्रमाध्ये जवाहरलाल नेहरू वै्रकीय महाविद्यालयाच्या विधाथ्र्यांचा समावेश करण्याबाबत शासनाकडे पुढाकार केला होता. त्या अनुषंगाने दत्ता मेघे इन्सिटटयुट ऑफ हायर एज्युकेशन अॅन्ड रिसर्च अंतर्गत सुरू असलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील पी विधाथ्र्यांना आता हिंगणी पीएचसी मध्ये सेवा दयावी लागणार आहे.

लवकरच डॉक्टर उपलब्ध करून देणार

सजवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय रूग्णांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे सावंगी मेडिकल कॉलेजच्या पीजी विधाथ्र्यांना हिंगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. दहा पीजी विधार्थी आळापाळीने हिंगणी पीएचसीला उपलब्ध करून देण्यात येईल. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या प्रयत्नामुळे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज व हिंगणी परिसरातील नागरिकांना चांगली सुविधा निर्माण झाली आहे.

डॉ. ललीत वाघमारे- कुलगुरू दत्ता मेघे इन्सिटटयुट ऑफ हायर एज्युकेशन अॅन्ड रिसर्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *