गांगापूर ते वडनेर येथील पांदन रस्ताची झाली दुर्दशा

हिंगणघाट : तालुक्यातील गांगापूर येथील पांदन रस्ता हा वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर महामार्ग क्रमांक ७ ला हा कच्चा पांदन रस्ता जोडला गेला आहे. गांगापूर येथील शेतकऱ्यांना व शेत मजुरांना शेतामध्ये जाण्यासाठी असलेला हा नेहमी पावसाळ्यात रस्ता चिखलाने माखलेला दिसून येत आहे.

मागील २५ ते ३० वर्षांपासून शेतकऱ्यांना व शेतमजुरांना, खूप त्रास भोगावा लागतो. शेतामधून घरी कापूस, तूर, सोयाबीन, गहू, हरभरा व सलपेट, खत आदी बैलंबडीने, ट्रॅक्टरने नेता येत सुद्धा नाही. गाडी तिथेच फसून राहतात. गावालाच लागून असलेल्या रस्त्याची दुर्दशा पांदन रस्ता नसल्याने अनेक वर्षानुवर्ष हा रोड चिखलाने माखलेला असतो. रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडपाने समाराज्य कच्चा रस्ता नाली नसल्यामुळे गावातील व शेतातील सार्वजनिक पाणी, त्या रस्त्यावर खोल पांदन रस्तावरून पाणी साचून खोल खड्डे पडले. प्रशासन मात्र सुस्त: परिसरातील शेतकरी त्रस्त.

खड्ढ्यामध्ये पाणी साचून राहते. मोठे तीन फुटाचे खड्डे पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या बैलंबडीचे नुकसान सुद्धा झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी परिसरातील तत्काळ मागणी, शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

मात्र हिंगणघाट विधानसभा चे आमदार समीर कुणावार यांना मात्र सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन भाजपचे तालुका प्रतिनिधी कैलास भोयर यांनी पांदन रस्ता साठी निवेदन देऊन लक्ष नसल्याने गांगापूर गावामध्ये पांदन रस्ता योजनेचा कोणताही लाभ सुद्धा मिळाला नाही. पांदन रोड पासून गाव वंचित आहे त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकरी अमोल साहेबराव राऊत, विलास मधुकर राऊत, विनोद भोयर, विठ्ठल पोहनकर, हनुमान पोहनकर, बंडुजी भोयर, पंकज राऊत, हरी भोयर, भानुदास भोयर, दादा राऊत कडू, वडनेर येथील शेतकरी शेतकरी मागणी करीत आहे, शिव पांदन रस्ता अपूर्ण असल्याने जवळ रस्त्यावर कुंपण केले आहे, काही दिवसांनी रस्ता राहणारच नाही मात्र रस्ता न झाल्याने रस्ता अतिक्रमण काही शेतकरी करणार शिव पांदन शेतात रस्ता जाण्यासाठी गावकऱ्याची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *