प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : गुन्ह्याची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी नामे हेमलता गजानन वाडकर वय ४६ वर्ष रा. अग्निहोत्री कॉलेज जवळ, रामनगर वर्धा यांचे पती सि.आय.एस.एफ. मध्ये नौकरीस असून सध्या भिलाई येथे कार्यरत आहेत. दिनांक १७/०४/२०२६ रोजी फिर्यादी हे केदारनाथ येथे दर्शनाकरीता गेलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राहते घराला कुलुप लावून गेलेल्या होत्या. त्या दिनांक ३०/०४/२०२६ रोजी दुपारी १२:०० वा. सुमारास परत घरी आल्या असता त्यांना त्याचे घराचे मागील दाराचे कुलुप व दार तुटुन घरातील पुर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
त्यांना शंका आल्याने त्यांनी घरात जावून कपाटाची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेले चांदीचे पायल व जोडवे किंमत अंदाजे १०,०००/- रू. व कपाटात ठेवलेले रोख रक्कम ३०,०००/- रू. असा एकुण जुमला किंमत ४०,०००/- रू. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र ३९८/२०२६ कलम ३०५(१), ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात घटनास्थळावरील आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज चे आधारे व गोपनिय बातमीदार यांचे कडुन मिळालेल्या माहिती वरून घटनास्थळाचे परिसरात दिनांक ३०/०४/२०२६ रोजी दुपारी १२:०० वा ते १४:३० वा. दरम्यान एक पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन क्र एम एच ४० ए एस २७०३ ही चोरी झालेल्या घटनास्थळावरील परिसरात संशयीत रित्या फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर वाहनाचा व चालकाचा शोध घेतला असता सदर वाहन हे नागपुर येथे आरोपी नामे प्रसन्न प्रमोद मेश्राम वय २६ वर्ष रा. चमेडीया नगर, यवतमाळ यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना सदर वाहनाबाबत सखोल विचारपुस केली असता सदर वाहन हे आरोपी नामे १) प्रसन्न प्रमोद मेश्राम यांनी किराणाने घेवुन त्याच्या साथीदार नामे, आरोपी क्र. २) साहिल उत्तमराव भरत वय १९ वर्ष रा. सुरभि नगर, पिंपळगाव रोड, यवतमाळ यांचे सोबत संगनमत करून दिनांक ३०/०४/२०२६ रोजी वर्धा येथे येवुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन १) एक पांढऱ्या रंगाची होन्डाई कंपनीची एक्सटर चार चाकी कार क्र एम एच ४० सी.एक्स २७०३ किं. ६,००,००० रू. २) एक मॅक ब्लॅक रंगाचा वन प्लस कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि. १५,००० रू. ३) रोख रक्कम नगदी ४,०००/- रू., ४) पांढऱ्या धातुचे(चांदीचे) दोन पायल व दोन जोडवे किंमत १०,००० रू. असा एकुण जु.कि. ६,२९,००० रू. चा माल आरोपीतांकडून जप्त करण्यात आले आहे. सदर कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक साहेब वर्धा, सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक साहेब वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वर्धा यांचे मार्गदर्शनात अजय भुसारी पोलीस निरीक्षक पो.स्टे. रामनगर, यांचे निर्देशानुसार पोहवा गजानन इवनाये ब.न. १२२६, पोहवा योगेश चन्ने ब.न. १६०, डी.बी. पथक अंमलदार पो.हवा. अजहर खान ब.न. ४४५, पोशी. राहुल भोयर ब.न. ७२४, पोशी. रुपेश डगेमुगे ब.न. ८८९, पोशी. सचिन पवार ब.न. १८ पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली आहे.