वर्धा : पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली असून, दि. १५ मे २०२६ रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मुखबिरीतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पो स्टे दहेगाव परिसरातील मौजा हमदापूर येथे प्रफुल तुळसीराम शंभरकर याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपीने त्याचे राहते घराचे वॉल कंपाऊंड लगत, शासनाची कोणतीही परवानगी न घेता, त्याचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता गांजा वनस्पतीचे एकूण ०५ फूट उंचीचे दोन झाडाची लागवड केल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, दोन्ही झाडाची पाने, फांद्या व मुळासह छाटणी करून त्याचे वजनमाप करून आरोपीचे ताब्यातून एकूण निव्वळ वजन ०४ किलो ९२ ग्रॅम गांजा वनस्पती जु.कि. ८१,८४० रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरुद्ध पो.स्टे. दहेगाव येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.