वर्धा : २८ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास वाहन क्र. एम. एच. ३१ सी. क्यु. ५१२१ क्रमांकाच्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. व कार चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व धडक झाल्यावर ट्रक ड्रायव्हरने कार मालकासोबत अरेरावीची भाषा केली.
ट्रक ड्रायव्हर दारू पिऊन असल्यामुळे ट्रक मालक गजेंद्र रायपुरे यांनी त्यावेळी चारचाकी मालकाला आश्वासन दिले की, जे तुमचे नुकसान झाले आहे. त्याची मी पुर्णपणे भरपाई करून देईल. व तेथून मद्यधुंद ड्रायव्हरला ट्रक मालकाने रवाना केले. व त्या ट्रक मध्ये अवैध मुरुम भरलेला होता. मुरुम भरलेला ट्रक हा भरधाव वेगाने होता. व निष्काळजीपणे चालवित होता. त्यावेळीची परिस्थिती हाताळून ट्रक ड्रायव्हर व मालक तेथून निघून गेले. पण मात्र वेळ निघून गेल्यावर ट्रक मालकाने चारचाकी मालकाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.
ट्रक मालकाने उलट उत्तर देऊन तुझ्याकडून जे काही होत असेल तर ते करून घ्याला, अशा शब्दात सुद्धा सांगितले. मग त्यानंतर कार मालकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला. व कलम २८१, ३२४(३), १८४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर ट्रकची माहिती मिळाली असता गाडी ही २०१५ पासून गाडीचे योग्यता प्रमाणपत्र नसल्यामुळे अवैधारीत्या वाहतूक करीत आहे.