दत्ता मेघे इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन आता झाले अदाणी इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन

युजीसीची मिळाली मान्यता

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था आता ‘अदाणी उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था’ या नावाने ओळखल्या जात असून यासाठी युजीसीची मंजुरीही प्राप्त झाली आहे. बाकी सर्व नावे जसेच्य तसेच राहील तर रुग्णसेवा उत्कृष्ट करण्यासाठी सुसज्जीत रुग्णालय करण्यात येत आहे.

रुग्णांना उत्कृष्ट सेवा व स्वस्त औषध एकाच छत्राखाली सर्व तपासण्या व उपचार होणार आहे. तर अदाणी फाउंडेशनच्यावतीने याच विद्यापिठाअंतर्गत ६० हजार कोटी खर्च करुन १५ विविध रुग्णालय करण्यात येणार आहे. व्हाईच चांसलर डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी आज सावंगी मेघे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला चीफ सर्व्हिसेस ऑफीसर रविंद्र मेहरे, सल्लागार डॉ. बोरले आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. वाघमारे म्हणाले, आमच्या संस्थेसाठी हा महत्त्वपूर्ण पाऊल असून आता वर्धा या गांधी जिल्ह्यात अदाणी इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन या नावाने प्रगती होणार आहे. यामुळे जिल्ह्याचे नाव आरोग्य क्षेत्रात नावलीकीक होईल तर सीएसओ रविंद्र मेहरे यांनी शैक्षणिक उत्कृष्टता, आरोग्य सेवा, रिसर्च, समाजाच्या प्रगतीसाठी संस्था कार्य करेल असे सांगितले. वर्धा जिल्ह्यात या संस्थेची सुरुवात लोकनेते दत्ताजी मेघे यांनी १९९० मध्ये वर्धा या गांधी जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे केली होती. या संस्थेचे चांसलर आता डॉ. प्रिती अदाणी असून त्यांच्या नेतृत्वात कार्य चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *