नेहा बोरा यांच्यावर शाई फेकण्यात आल्याच्या घटनेचा भीम टायगर सेना व रिपाईं (आंबेडकर) तर्फे तीव्र निषेध!

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : झारखंडमध्ये नेहा बोरा यांच्यावर शाई फेकण्यात आल्याच्या घटनेचा आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हा भीम टायगर सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भीम टायगर सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल रामटेके व कार्यकर्त्यांनी तसेच रिपाईं (आंबेडकर) चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ही घटना भाजपच्या कथित दबावाच्या राजकारणाचे तसेच धर्मंधतेच्या कुटील कारस्थानातून घडविण्यात आली असून देशात विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य दिशेने सुरू असताना हेतुपुरस्सर सूदबुद्धीने नेहा बोरा यांच्यावर शाही फेकण्यात आली.

केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु विद्यार्थी व जेन तरुणांच्या आंदोलनाची धार देशात आणखी तीव्र होईल, असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पंकज लुभाणे, बंडू फुलमाळी, अमित नाईक, बाबा वडगे, राहुल पिंपळकर, राकेश पांडे, कन्हैया उईके, सुमित गजभिये, अमित गजभिये, रोहित यादव, सिद्धार्थ मेश्राम, सचिन वासनिक, स्वप्नील दिवे, आशिष दिघाडे, प्रशांत रामटेके, शिधांत मून, विकास झांझाल, चांद खा पठाण, नयन रामटेके, आकाश खरे, निषाद शेख, सोनू शहरे, सुंदर, आकाश लोणारे, उत्कर्ष वालमंचुरे, प्रकाश कोरडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *