बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहकांची नेहमीच होते गोची

शाखेचा कारभार ग्राहकांच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी, नागरीकांचा सवाल

(अभय बेदमोहता)प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,सेलू : स्थानिक बँक ऑफ इंडिया शाखेत नेहमीच ग्राहकांची गोची होत असून एकाच काऊंटरवरून व्यवहार केले जात असल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्यांना तास न तास रांगेत उभे राहावे लागते. येथील या शाखेचा कारभार हा ग्राहकांच्या सुविधेसाठी की गैरसोयीसाठी असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.

या बँकेतील ग्राहक संख्या तथा होणारे व्यवहार पाहता येथे दोन काऊंटर नियमीत सुरु पाहिजे. पण येथे एकाच काऊंटरवरून सर्व व्यवहार चालते. ग्राहकांची गर्दी पाहता दुसरे काऊंटर सुरू करण्याचे सौजन्य या येथील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांकडे नाही. यामुळे व्यवहारासाठी आलेल्या वयोवृद्धांची येथे फरफट होत आहे. लोकांना तास न तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने अनेक जण या बँकेचे कामकाजाला कंटाळले आहे. या बँकेत कामानिमित्त आलेल्या नागरीकांना त्रास देण्याचे धोरण या येथील कर्मचारी वर्गाचे असून त्यांचे चुकीचे मार्गदर्शन तथा उर्मट वर्तणुकीमुळे अनेक जण त्रस्त झाले आहे. यामुळे बँकेच्या कारभाराविषयी येथे प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ही बँक ग्राहकांना चांगली सेवा देण्यापेक्षा त्यांना त्रास देण्यात धन्यता मानतात असे चित्र येथे पाहायला मिळते.

येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता काम करण्याची नसल्याचे यावरून स्पष्ट होते. अनेकांचे खात्याला नॉमीनी दर्ज असतांना ती रेकॉर्डवर घेतली गेली नसल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. पासबुकवर नॉमीनी समोर एस असा उल्लेख असताना नॉमीनी नसल्याचे सांगतात. यावरून येथील कामकाजाची कल्पना येते. तसेच अनेक मैय्यत खातेदारांचे पैसे यांचे अशा धोरणामुळे तसेच पडून आहे. त्यांचे वारसानाची येथे अडवणूक होत असून त्यांना त्रास देण्याचे धोरण येथील कर्मचाऱ्यांचे असल्याने अनेकांनी बँकेचा रस्ता ओलांडणे सोडून दिले हा खातेधारकावर अन्याय आहे.

येथे कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून वरिष्ठांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. वरिष्ठांना ते जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. येथे ग्राहकांची होणारी गैरसोय आणि कर्मचाऱ्यांची अशी वागणूक पाहता संबंधीत वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष वेधून त्वरीत उपाययोजना करावी व यास जबाबदार असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करून ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

येथे या बँकेत नेहमीच अशी अवस्था असते आमचेसारखे जेष्ठ नागरीकांना येथे तास न तास रांगेत उभे राहावे लागते याबाबत व्यवस्थापकाकडे विचारणा केल्यास आमचेकडे स्टाफ कमी आहे असे उत्तर दिले जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *