ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथील दातांचा उपचार फक्त देखावा, खाजगी रुग्णालयात दात काढण्यासाठी मोजावे लागते ३२०० रुपये

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,समुद्रपूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण रुग्णालय येथे ग्रामीण जनते साठी मोफत उपचार व्हावा याकरिता सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अश्याच दातांच्या (अहूत) दुखणे करिता शासनाने बरेचसे पैसे खर्च करून मशीन व डॉक्टरांची नेमणूक केली आहे. येथे दातांचा रुग्ण आल्यास फक्त तपासून औषधउपचार करून परत पाठविले जातात. औषधी ने केवळ तात्पुरता आराम होतो पण पूर्ण आराम मिळत नाही जेणे करून समुद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात जावे लागते.

एका रुग्णाला दात काढण्यासाठी ३२०० रुपये मोजावे लागले ही शोकांतिका आहे. ग्रामीण रुग्णालय येथे दातांचे डॉक्टर दररोज असतात ते डेंटल वॉर्ड मध्ये बसत नसून ते जनरल वॉर्ड मध्ये बसून रुग्णाची जनरल तपासणी करून उपचार करतात.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दातांचे (दात काढणे, दात स्वच्छ करणे असे बरेच) सर्व प्रकारचे उपचार होतील असे वैद्यकीय अधिकारी द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *