समृद्धपूर : नागपूर येथे ९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंगणघाट समुद्रपूर सिंदी (रे.) मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांची तालिका अध्यक्षपदी निवड केली आहे. चौथ्यादां हिंगणघाट क्षेत्रातील आमदार कुणावार यांची तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी वर्धेचे तत्कालीन दिवंगत आमदार प्रमोद शेंडे यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून विधान मंडळाचे कामकाज करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या नंतर विधानसभा तालिका अध्यक्ष बहुमान मिळाला. नागपूर अधिवेशनात विदर्भातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार व सहकारी आमदारांचे आभार मानले.
आहे. आमदार समीर कुणावार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार व सहकारी आमदारांचे आभार मानले. सभागृहात तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज करतांना महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींच्या मतदार संघातील न्याय उचित मागण्यांना सभागृहामध्ये मांडण्याचे सौभाग्य मिळणार असून निश्चितच दिलेल्या संधीचे सद- उपयोग करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मत आमदार कुणावार यांनी व्यक्त केले.