प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर हयांनी नागपूर-मुंबई दुरन्तो एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा मिळणेबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून पत्राद्वारे विनंती केली होती. चंद्रपूर-वणी या भागातील लोकांना दुरन्तोने मुंबईला जायचे असल्यास त्यांना नागपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे त्यांना त्रासदायक होती. ही बाब लक्षात घेऊन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दुरन्तो एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा मिळणेबाबत रेल्वे मंत्र्यांना विनंती केली होती. रेल्वे मंत्र्यांनी खासदार धानोरकर यांचे मागणीची दखल घेऊन दुरन्तो एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे.
दुरन्तो एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा मिळाल्याने वर्धा जिल्ह्यातील नागरिकांची सोय झाली असून आता वर्धा जिल्ह्यातील लोकांना नागपूर येथे जाण्याची गरज भासणार नाही. वर्धा येथूनच दुरन्तो एक्सप्रेसमध्ये बसता येईल. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा दुरन्तो एक्सप्रेसची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार अमर काळे यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.