खासदार अमर काळे यांनी मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली मागणी
प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : १ मार्च २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एस.बी.आय. एनर्जी लि. या कंपनीमध्ये स्फोट होऊन २२ मजुरांचा भाजून मृत्यू झाला त्यात २० महिला मजुरांचा समावेश होता. ही घटना फारच गंभीर व मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या दृष्टीने दुर्भाग्यपूर्ण आहे. काटोल तालुक्यामध्ये स्फोटके तयार करणाऱ्या २० कंपन्या कार्यरत असून मागील अडीच वर्षात या कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोटात जवळपास ५० मजुरांनी आपले जीव गमावले आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील औद्योगिक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कंपन्यांमध्ये स्फोटके तयार करण्यात येत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सेफ्टी ऑडीट नियमित व्हायला पाहिजे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे एसबीआय कंपनीमध्ये शेवटचे सेफ्टी ऑडीट २७ जानेवारी २०२४ ला करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दोन वर्षे होऊन सेफ्टी ऑडीट अजून पर्यंत करण्यात आले नाही. त्यामुळे स्फोटक तयार करणाऱ्या अतिसंवेदनशील उद्योगात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत करण्यात आलेली बेपर्वाही हा मोठा गंभीर विषय आहे. एवढेच नव्हे तर याला अपराध म्हणून संबोधले तरी वावगे ठरणार नाही. याबाबतित सरकारच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांवर देखरेख ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणा बाही या घटनेला तेवढ्याच जबाबदार आहेत. शासनाने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने कागदावर मोठमोठे कायदे करून ठेवले आहेत. परंतु हे कायदे राबविताना शासकीय यंत्रणा किती बेजबाबदाररीने वागते हे या कारखान्यांमध्ये झालेला स्फोट व गोरगरीब मजुरांची झालेली जीवित हानी हे स्पष्ट करते. त्यामुळे याला कंपनीचा मालक किंवा कंपनीचे प्रशासन यासोबतच सरकारी यंत्रणा सुद्धा तेवढ्याच कारणीभूत आहेत.
दि. २ मार्च २०२६ ला विभागीय आयुक्त कार्यालयात या घटनेच्या संदर्भात उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्र सरकारची ईईचव महाराष्ट्र शासनाची अद्यए या संस्थेच्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा निर्णय झाला होता असेही कळते. परंतु त्या निर्णयावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही व कुणावरही कार्यवाही झालेली नाही. सदर बाब खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटून या झालेल्या अपघाताचे गांभीर्य व त्यात नाहक बळी पडलेल्या गोरगरीब मजुरांचा जीव गेल्याने झालेल्या जीवित हानी बद्दल इत्भूत माहिती देऊन याच अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी तसेच शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खासदार अमर काळे यांनी दिलेल्या माहितीवरून घटनेचे गांभीर्य ओळखून झालेल्या जीवित हानी बद्दल हळहळ व्यक्त केली व या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंपनी व जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.