प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ८ डिसेंबर रोजी सेवाग्राम मार्गावरील उड्डानपुलावर दुपारच्या सुमारास घडली. सिंदी (मेघे) येथील नत्थुजी दारूंखदे (वय ७०) हे एमएच ३२ बीए ४१७९ क्रमांकाच्या दुचाकीने गोजी येथे शेतात जात होते. यावेळी एमएच ४० एन २७८८ क्रमांकाचा खत भरून सेवाग्रामकडे ट्रक जात होता. दरम्यान, वर्धा सेवाग्राम मार्गावरील उड्डानपुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात घडला.
या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. अपघातामुळे काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. सेवाग्राम पोलीस, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.