प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालय येथील जनता दरबार मध्ये मा.डॉ.पंकजजी भोयर राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांना वर्धा शहराचे मुख्य प्रवेश द्वार दत्तपूर येथील वर्धा रिंग रोड चौफुलीवर आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित सौंदर्यीकरण करून तिथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्या परिसराला भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आचार्य विनोबा भावे प्रेमी तसेच नालवाडी व दत्तपूर वर्धा वासीयांतर्फे करण्यात आली. दत्तपूर व नालवाडी येथील विनोबा भावेंचे असलेले वास्तव्य व सामाजिक कार्य दत्तपूर येथे कुष्ठ सेवा समिती स्थापून कुष्ठ रुग्णांची सेवा करून त्यांना समजत जगण्याचा अधिकार दिला तसेच नालवाडी येथे ग्राम सेवा मंडळ स्थापन करून येथे हरिजन वस्तीत स्वतः साफ सफाई करून स्वच्छता मोहीम राबवून अस्पृश्य निवारण संदेश खादी ग्रामउद्योगाचा प्रसार हा संपूर्ण देशा पर्यंत पोहोचविला.
भूमिहीन गौर गरीब दलित कुटुंबियांना जगण्यासाठी त्यांना शेती करण्यासाठी जमीन भूदान चळवळीच्या माध्यमातून जमिनी उपलब्ध करून दिल्या देशातील असंख्य भूमिहीनांना जमिनी मिळवून दिल्या त्या भूदान यज्ञाचे वैचारिक केंद्र हेच होते. विनोबा भावे यांनी लिहिलेले गीतेचे सोपे मराठी काव्यरूपांतर म्हणजे गीताई ग्रंथ याचे संपूर्ण सार आपल्याला नालवाडी येथील गीताई मंदिर गोपुरी येथे पाहायला व वाचायला मिळाले. संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे कार्य दत्तपूर व नालवाडी येथे केले. या परिसरात एवढे मोठे असलेले त्यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे हे सामाजिक कार्य देश विदेशातून वर्धेत येणाऱ्या नागरिकांना व सर्व जनसामान्य पर्यंत पोहचावे याकरिता वर्धा रिंग रोड दत्तपूर चौफुलीवर त्यांच्या जीवनावर आधारित सौंदर्यीकरण करून तिथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्या परिसराला आचार्य विनोबा भावे हे नाव देण्यात यावे हीच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची त्यांना मानवंदना असेल याकरिता राज्यमंत्री मा डॉ. पंकजजी भोयर यांना बंटी खडसे व वैभव सूर्यवंशी यांनी निवेदन दिले. वर्धा नागपूर महामार्गावरील दत्तपूर येथील चौकाला भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचे नाव देण्यात यावे व तिथे भारतरत्न आचार्य विनोबा भावेंचे स्मारक करण्यात यावे