उमेद मॉल मंजूर केल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचा उमेदमधील महिलांतर्फे सत्कारप्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांचा स्वतःच्या मालकीचा ‘उमेद मॉल’ उभारणार
वर्धा (जिमाका) : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘उमेद’ मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांची उपस्थिती होती.
कारграммаच्या सुरुवातीला उमेदमार्फत वर्धा येथे उमेद मॉल मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा सत्कार करण्यात आला.
देशाच्या एकूण लोकसंख्येत महिलांचा वाटा जवळपास निम्मा आहे. महिला सक्षम झाल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून उमेदमार्फत ग्रामीण महिलांच्या पंखांना बळ देण्याचे काम सुरू आहे. बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले आहे, असे श्री. गोरे म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरावर सौर पॅनेल बसविण्याचे मोठे काम बचतगटांच्या महिलांना देण्याचे प्रस्तावित आहे. राज्यात सुमारे ३० लाख सोलर पॅनेल बसविण्याचे उद्दिष्ट असून, या काامات बचत गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. महिलांनी मागणी केलेल्या प्रमाणात त्यांना काम उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री श्री.गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्रामीण महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. घरकुलासाठी मिळणाऱ्या अतिरिक्त अनुदानातून सौर ऊर्जेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना श्री. गोरे म्हणाले, देशातील लखपती दीदींच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी बचत गटांची संख्या वाढवून अधिकाधिक महिलांना उमेदमार्फत जोडण्यात यावे. महिला बचत गटांना आतापर्यंत सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून महिलांनी कर्जाची परतफेड अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.
उमेदच्या प्रभाग संघांना समुदाय गुंतवणूक निधीचे तसेच स्वयं सहायता समूहांना बँक लिंकेज निधीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी उमेदमअभियानाच्या जिल्ह्यातील कामाचा आढावा सादर केला. यावेळी उमेदमधील महिला बचत गटांच्या सदस्य संगिता गायकवाड, कल्पना बनसोड, लक्ष्मी शेंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार निरज नरκέ यांनी मानले. कार्यक्रमास उमेदमधील महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गटांच्या उत्पादनांची गुणवत्ता उत्तम दर्जेची असावी : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
महिला बचतगटांनी मोठ्या मेहनतीने उद्योग उभे केले आहेत. त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उत्पादनांची गुणवत्ता बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करणारी असणे आवश्यक आहे. त्यासोबतच प्रभावी मार्केटींगचे नियोजनही गटाने करणे गरजेचे आहे. वायगावची हळद ही वर्धा जिल्ह्याची विशेष ओळख असून महिला बचत गटांच्या माध्यमातून तिचे उत्पादन केले जात आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी वायगावची हळद दुबईला निर्यात करण्यात आली. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने केवळ गुणवत्तेमुळे नव्हे, तर प्रभावी मार्केटींगमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पोहोचतात. त्यामुळे महिला बचत गटांनीही उत्पादनांची गुणवत्ता आणि मार्केटींग या दोन्ही बाबींवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केले. तसेच वर्धा जिल्ह्यासाठी उमेद मॉल मंजूर बद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आभार मानले.