वर्धा: नागपूर येथील रवी भवन येथे आज राष्ट्रीय कामगार सेना, महाराष्ट्र राज्याचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित, तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.
यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते तुषार देवढे (वर्धा) यांच्या पक्ष व संघटनात्मक कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार त्यांची वर्धा जिल्हा कामगार सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख संजयजी निरुपम, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेश सचिव अमित भटनागर, महिला कामगार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आशाताई वैकुंठ, राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, पूर्व विदर्भ अध्यक्ष दिलीप आवळे, विदर्भ अध्यक्ष आकाश हेरोळे, पूर्व विदर्भ सरचिटणीस मनोज मेश्राम, विदर्भ सरचिटणीस बंडू तळवेकर, कॉग्रेड अक्रम पठाण यांच्यासह राज्य व विदर्भातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर तुषार देवढे यांनी सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. यावेळी नबनाथ भुसनर, स्वप्निल गोटे, अविनाश उबाळे, मनोज आत्राम, निखिल गोसावी, शैलेंद्र थोरात, अशांक कावळे (ग्रामपंचायत सदस्य, नलवाडी), विठ्ठल चौधरी, दिलीप फाटे, निळू रुद्रकार, शुभम ठाकूर, सतीश नवरखेडे, निलेश मिश्रा, नानाभाऊ जांभुळकर, दादाराव गायकवाड, मोहन शिंदे, श्याम देशमुख, हरीश चौधरी, ओंकारेश्वर मुदे, राजेंद्र चावरे, पैलवान संजय कापसे, मोहित पवनारकर, आकाश सिरसीकर, पियुष दांडेकर, गौरव भिलाये, विजय दरणे, बबलू धारपुरे, इमरान खान, धीरज चव्हाण, दीपक दहेकर, सचिन देवढे, महेश शास्त्री, अमर दादळे, अर्जुन कांबळी, पैलवान किसन प्रधान, नंदकिशोर पांडे, रणजीत ईवनाथे (ग्रामपंचायत सदस्य, नलवाडी), दिलीप फटिंगे, अशोक भिलखोडे, अविनाश जांभुळकर, बालू हजारे, मोहन निंबाळकर तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी तुषार देवढे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.