वर्धा : पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यात होणारा संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करत असून त्यात नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे मत सहायक वनसंरक्षक माधव आडे यांनी व्यक्त केले.
पांजरा बंगला येथे इंटेलेक्च्युअल सोसायटी ऑफ मीडिया प्रमोटर्स (आयएसएमपी) यांच्या वतीने ग्रामीण नागरिकांसोबत पर्यावरण जनजागृतीपर संवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवार, ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी वनसंवर्धन, वनविकास आणि वन्यजीव संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
पांजरा बंगला येथील शाळेत आयोजित कार्यक्रमास वन्यजीव संरक्षक कौशल मिश्र, आयएसएमपीचे अध्यक्ष चंद्रशेखर आणि बी. एस. मिरगे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या परिसराला ‘अरण्यऋषी मारुती चितमपल्ली परिसर’ नाव देण्यात आले होते. वक्त्यांनी पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
या वेळी आयएसएमपीच्या वतीने सहायक वनसंरक्षक माधव आडे, कारंजा परिक्षेत्राचे क्षेत्राधिकारी नरेंद्र सावंत, वनरक्षक शिवाजी सावंत, वनरक्षक अश्विनी कोहपरे, राऊंड ऑफिसर प्रवीण देहणकर, प्रताप ढाले, वनरक्षक सुनंदा उईके, वनरक्षक अक्षय जाधव, वनरक्षक अंचल रामटेके, पोलीस पाटील मुकेश चव्हाण आदींना सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्थानिक ग्रामस्थांकडून वनौषधी व उपचाराविषयीची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक शिवाजी सावंत यांनी केले.
यावेळी डॉ. ओ. पी. गुप्ता, एन. एन. काझी, प्रदीप श्रीवास्तव, राजेंद्र चौधरी, ए. एन. तहसीलदार, सुनील पांडेय, डॉ. अक्षय पारगावकर, डॉ. मंगेश भोयर, डॉ. अनिर्वाण घोष, डॉ. शाहिद अली, विजय देशपांडे, प्रदीप आयुर्विज्ञान संस्थान, आणि पांजरा बंगला संख्येने उपस्थित होते.