गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

खासदार अमर काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : वर्धा जिल्ह्यात नुकताच झालेला अकाली पाऊसामुळे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झालेले आहे. काही शेतकऱ्यांचे तुरीच्या गंजी शेतात होत्या तर काही लोकांचा चन्याची संवगणी करून शेतात पडून होते इतकेच नव्हे तर गव्हाचे पिक सुद्धा सवंगणीला आल्याने शेतातच उभे होते. या पिकाच्या उत्पन्नातून काहीतरी मिळेल या आशेने शेतकरी असतांनाच अचानक जिल्ह्यात वादळी पाऊस व त्यातही काही भागात गारपीट झाले व पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास झालेल्या अकाली पाऊस व गारपिटीने हिरावून घ्यायचे काम केले.

विशेषतः समुद्रपूर व हिंगणघाट भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे गव्हाचे उभे पिक जमिनीदोस्त झाले तर काही शेतकऱ्यांनी चना संवंगुन ढीग लावून शेतात ठेवला होता तो ही या पावसाने संपूर्ण ओला झाला. शेतकरी वर्षभर शेतात काबाडकष्ट करतो व केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून हातातोंडाशी आलेले पिक व आलेले पिक बाजारात विकून काहीतरी पदरात पडेल या आनंदात असतांनाच हा अकाली पाऊस शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला.

पुन्हा एकदा शेतकरी रडकुंडीला आला. या सर्व प्रकरणांची खासदार अमर शरदराव काळे यांनी कृषी विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *