वर्धा (जिमाका): भारतीय रिझर्व्ह बँक व राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या दिशानिर्देशानुसार दिनांक ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी वित्तीय साक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे आंचलिक व्यवस्थापक कुश गणहोत्रा यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्मारक सभागृह, कृष्णनगर येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर येथील साहाय्यक प्रबंधक महेश थुल, आर्थिक व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक सुरज बोबडे, बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक श्याम अत्यालगडे आदी उपस्थित होते.