तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतवर दुसऱ्यांदा येणार ‘प्रशासकराज’

सेलु : तालुक्यातील राजकीय पटलावर सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आल्याने पुन्हा एकदा ‘प्रशासकराज’ येण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायतीवर दुसऱ्यांदा प्रशासकाची नियुक्ती होण्याची वेळ आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित हिंगणी, येळाकेळी अशा मोठ्या ग्रामपंचायतीची मुदत येत्या १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे. या ग्रामपंचायतीचा इतिहास पाहता कोरोना काळ असल्यामुळे १६.०८.२०२० ते १४.०२.२०२१ काळात या भागातील सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाही. तेव्हा सात ते आठ महिन्यांकरिता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. तर आता १५ फेब्रुवारी ला कार्यकाळ संपत असल्याने व निवडणूक केव्हा होणार हे निश्चित नसल्याने पुन्हा किती महिन्यासाठी दुसऱ्यांदा प्रशासकराज राहिल हे न सोडवणारेच कोडेच आहे.

त्यावेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून होत नसल्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडणे होते. त्यामुळे येथे पहिली मासीक मिटिंग ज्या दिवशी बोलविण्यात येते त्या दिवसापासून कार्यकाळ सुरु झाल्याचे समजले जाते. तेव्हा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका मध्ये हिंगणी, येळाकेळी व चारमंडळ-धपकी गट ग्रामपंचायत चा समावेश आहे. म्हणून येत्या फेब्रुवारीच्या १५ तारखेला हिंगणी तसेच येळाकेळी येथील सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. व निवडणुका लांबणीवर जात असल्याने प्रशासकाची नियुक्ती होणार असे संकेत मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *