(अजीज शेख) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे-वर्धा : कोविड-१९ च्या महामारीमध्ये कोविडचा प्रसार व त्याची दाहकता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारा अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर अनेक गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. आज २०१९ ते २०२५ कोरोनाची महामारी संपूर्णतः संपलेली आहे. अनेक रेल्वेगाड्या पूर्ववत सुरु झाल्या आहेत. परंतु गाड्या सुरु होऊनही गाड्यांना कोरोना आधी असलेले थांबे नागरिकांकडून अनेकदा मागणी करूनही सुरु करण्यात आले नाही. याबाबत खासदार अमर काळे हे सन २०२४ पासून या विषयावर सतत पाठपुरावा करत आहेत. रेल्वे विभागाने खासदार अमर काळे यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेऊन काही ठिकाणी थांबे सुरु केले आहेत.
परंतु अद्यापही काही गाड्यांचे ज्या प्रवाशांच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या आहे त्या गाड्यांचे थांबे सुरु केले नसल्यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे. त्यासोबतच पुलगांव ते आर्वी या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा महामार्ग पुढे वरुड पर्यंत वाढवून ज्या रेल्वेमार्गामुळे पुलगांव केंद्रीय दारुगोळा भांडार ते आमला दारुगोळा भांडार यातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाचे काम तातडीने करण्याबाबत तसेच तेलंगणा एक्सप्रेसला सेवाग्राम स्टेशनला, हावडा अहमदाबाद एक्सप्रेसला पुलगाव येथे, चेन्नई एक्सप्रेस, सिकंदराबाद दानापूर एक्सप्रेस, कोरबा एक्सप्रेस, अहिल्यानगरी एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस, राप्तीसागर एक्सप्रेसला, पुरी ओखा एक्सप्रेसला, नागपूर सिकंदराबाद एक्सप्रेसला इत्यादी गाड्यांना हिंगणघाट येथे महाराष्ट्र एक्सप्रेसला सेवाग्राम येथे, नागपूर-पुणे-नागपूर एक्सप्रेसला चांदूर रेल्वे येथे, अमरावती-अजनी इंटरसिटीला चांदूर रेल्वे, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंधी, तुळजापूर येथे तसेच अमरावती-जबलपूर-अमरावती ला तुळजापूर येथे, विदर्भ एक्सप्रेसला तुळजापूर येथे यासोबतच काजीपेठ गाडी बल्हारशाह ते एल.टी.टी. गाडी, चेन्नई जोधपूर, मदुराई जोधपूर हया गाड्या नियमित (दररोज) चालविण्याबाबत तसेच चांदूर रेल्वे स्टेशन, धामणगाव रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांना दयावयाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत अशा अनेक मतदार संघातील मागण्या घेऊन खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
या भेटीत खासदार अमर काळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली व त्याबाबतचे पत्र खासदार अमर काळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले. रेल्वे मंत्र्यांनी खासदार अमर काळे यांच्या पत्राची दखल घेऊन याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पत्रातील प्रत्येक मुद्द्या संबंधात सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याबाबतचे आश्वासन खासदार अमर काळे यांना देण्यात आले. मतदार संघाच्या मागण्यांविषयी खासदारांची तळमळ लक्षात घेता सामान्य नागरीकाला सुद्धा तरुण तडफदार व मतदार संघातील लोक हिताच्या प्रत्येक मागणीबाबत खासदारांची तळमळ ही वाखाणण्याजोगी आहे. याबाबत नागरीकांनी सुद्धा खासदारांच्या कार्यशैलीप्रती समाधान व्यक्त केले.