वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव श्यामजीपंत येथील महिला वैद्यकीय अधिकारी यांचे वर एमएलसी करिता आलेल्या आरोपीने केला हल्ला दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता कर्त्यत्वावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी यांचे वर पोलीस स्टेशन तळेगाव येथील पाच पोलीस शिपाई एका आरोपीला वैद्यकीय तपासणी करिता आणले असता तपासणी दरम्यान पोलिसांच्या हलगर्जी पणामुळे सदर आरोपीने महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हल्ला केला. सदर हल्ला केला असता पाच पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना सुद्धा हल्ला झाल्या त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आशा स्वयंसेविका यांची मासिक आडाबासह सुरू होती
या हल्ल्यामुळे व्यतीत होऊन सर्व कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन गाडून सदर हल्ल्याचा निषेध नोंदवून तक्रार नोंदκली पाच पोलीस कर्मचारी असताना सुद्धा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हल्ला होत असल्याने सदर पोलीस कर्मचारी वांचे वर कामात हलगर्जीपणा केल्याबाबत योग्य ती कार्यवाही होईपर्यंत तसेच हमला करणाऱ्या आरोपी विरुद्ध योग्य ती कार्यवाही होईपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी पोलीस स्टेशन तळेगाव श्यामजीपंत येथे ठिय्या आंदोलन करणार केले, आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांच्यमती सी. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले यांना निवेदन देऊन प्रकरणाची दखलघेऊन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरविण्यात यावे व उल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले
यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ महाराष्ट्र राज्यवैद्यकीय अधिकारी संघटना गट ब महाराष्ट्र राज्य सामुदायिक अधिकारी संघटना च्या वतीने निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर मंगेश रेवतकर मॅग्मा वैद्यकीय अधिकारी संघटनेचे डॉक्टर श्रीधर ताम्हणकर डॉक्टर डॉक्टर स्नेहल राठोड डॉक्टर प्रभाकर नाईक डॉक्टर माधुरी दिघेकर डॉक्टर मोनाली मार्मीळवार डॉक्टर भारती बहादूरे डॉ श्रुति मसराम डॉक्टर अमोल वेळणे डॉक्टर प्रवीण धमाने डॉक्टर रॉबिन कांबळे, वैद्यकीय अधिकारी महासंघ डॉक्टर भागवत राऊत प्रशांत वाडीभरसे डॉक्टर दीपक वाघमारे डॉक्टर प्रफुल्ल गोरडे डॉक्टर संगीता दंगे आरोग्य कर्मचारी संघटनेचे दिलीप ढटाणे बाबाराव कनेर अविनाश चव्हाण शेख हुसेन शरद डांगरे अमित कोपुलवार सामुदायिक आरोग्य अधिकारी संघटनेचे अक्षय इंगळे डॉक्टर विना बासनिक डॉक्टर भारती पारधी पंकज खासदेव डॉक्टर पारुल तपase इत्यादी शेकडो अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
