वर्धेत राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न

भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे ज्याची मुळे वैदिक काळाशी जोडलेली आहे. भारतीय संगीतात गायन वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा समावेश होतो. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणून ओळखले जाणारे शास्त्रीय संगीत केवळ एक कलात्मक अभिव्यक्ती नाही तर एक दैवी विज्ञान आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेबी सुनील बुरांडे यांनी केले.

ते सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय व गुरुवर्य सुरेश चौधरी स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलत होते. उद्घाटीय समारंभाला डॉ. रंगराव राठोड, रवी खाडे, प्रा. विकास काळे, रणजीत इंगोले उषा फाले, दामोदर राऊत प्राचार्य जयश्री कोटगीरवार प्रामुख्याने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक इमरान राही तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल, गणेश अतकर प्राचार्य जयश्री कोटगीरवार विलास कुळकर्णी, सुरेश पट्टेवार प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

संगितामध्ये आपल्या आत्म्याच्या अशा भागांना स्पर्श करण्याची एक आद्वितीय शक्ती आहे. जिथे शब्द पोहोचू शकत नाहीत ते अशा भावनांशी एक संबंध निर्माण करते ज्यात आपण नेहमीच स्पष्ट करू शकत नाही आणि आपल्या मनात अशा स्पष्ट प्रतिमा रंगवते जे आपल्या डोळ्यांना कधीही दिसणार नाही अशी भावना शायर इमरान राही यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मोहन अग्रवाल यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पटेवार संचालन स्मिता पडोळे, वनिता धामंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंत पलेरिया यांनी केले.

पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी परीक्षण हिंडोल पेंडसे नागपूर व केतकी कुलकर्णी वर्धा यांनी केले. सदर स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राचार्य जयश्री कोटगीरवार यांच्यातर्फे दिल्या गेलेला रोख दहा हजार व स्मृतिचिन्ह शिवम शर्मा अकोला तर द्वितीय पुरस्कार रोख ७००० रुपये व स्मृतिचिन्ह डॉ. सुचित्रा कुबें यांच्याकडून वैष्णवी केरळे भुसावळ तर तृतीय क्रमांकाचे पुरस्कार रोख ५००० व स्मृतिचिन्ह मोहन बाबू अग्रवाल यांचे कडून गरिमा शेजाळ चंद्रपूर हिला देण्यात आला.

प्रोत्साहन पर पाच पुरस्कार प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले सानिका बोभाटे वर्धा, हर्षदा गबस्ती भद्रावती, रिद्धिमा शेजाळे, जानवी निमजे व आरोही धीरण.

सदर पुरस्कार यशवंत पलेरिया, पुरुषोत्तम खासबागे, गिरीश सावळकर, प्रल्हाद मानकर व मधूसूदन दीक्षित यांनी प्रायोजित केले. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने १०३ वर्षीय ह.भ.प दशरथजी चंदनखेडे यांना जीवन गौरव तर शंकर तिखे व शिवाजी चवरे यांना संगीत भूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभ नंतर सुप्रसिद्ध गजल गायक प्रसन्न जोशी नागपूर यांच्या सुमधुर गजलांचा कार्यक्रम संपन्न झाला.

उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री श्याम सरोदे अक्षय काटपाताळ, सुरेश चावरे अशोक तुरक्याल उमेश कापकर, प्रकाश वैद्य, संजय तीळले, चंद्रकांत तीळले, शैलेश माकरे इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *