रस्त्याच्या बांधकामासाठी प्रभाग ७ च्या नागरिकांचा धडक मोर्चा

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : प्रभाग ७ मधील घुगुसकर गॅरेज ते पावडे चौक, पावडे चौक ते धंतोली चौक, धंतोली चौक ते मेन रोड हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे व धूळीचे साम्राज्य आहे त्यामुळे प्रभागातील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आहे हा रस्त्याचे त्वरित बांधकाम करा या मागणी साठी नगरसेविका श्वेता वरुण पाठक यांच्या नेतृत्वात नागरिकांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

निवेदनात पाठक यांनी मागणी केली की आहे कि या मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालय, रुग्णालय असून अति रहदारी चा रस्ता आहे. या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. रस्त्याची ही दयनीय अवस्था असल्यामुळे येथून वाहने जाणेही कठीण होते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी, आणि आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होतात.

या रस्त्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि दळणवळण सुलभ होईल. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी मी आपल्याला या संदर्भात निवेदन दिले होते. या निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही किंवा नगरपालिकेकडून कोणतीही ठोस आश्वासन मिळाले नाही. म्हणजेच माझ्या लेखी निवेदनाला केळाची टोपली प्रशासनाने दाखवली असे समजण्यास हरकत नाही प्रशासनाने शेवटी रस्त्यावर उतरायची वेळ आणली आहे.

या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने नवीन रस्त्याच्या कामास मंजुरी द्यावी किंवा असलेल्या रस्त्यातील अडथळे दूर करून रस्ता उपलब्ध करून द्यावा. येणाऱ्या १ फेब्रुवारी २०२६ तारखेपर्यंत जर आपण आमच्या अर्जाची दखल घेतली नाही किंवा आपल्या मार्फत कोणतेही ठोस पाऊल उचलल्या गेले नाही तर मी स्वतः व माझ्या प्रभागातील नागरिक रस्ता रोको आंदोलन ची भूमिका घेऊ अशी भूमिका घेण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ व मुख्याधिकारी नगरपरिषद वर्धा यांना निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांनी येत्या २८ तारखेपर्यंत प्रस्ताव पाठवून निधीबद्दल मागणी करण्यात येईल व त्वरित लेखी स्वरूपात काय कारवाई करणार याचं पत्र नगरसेवकांना देण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी नगरसेवक शैलेश मुन्ना झाडे, समीर देशमुख, माजी नगरसेवक वरुण पाठक, नगरसेवक सोनू ठाकूर, नीरज त्रिपाठी, विलास अष्टेकर, विनय डहाके, मोहन इंगोले, उदय चंदाराना, शब्बीर शेख, श्याम लंगडे, सुरेश सलामे, प्रणिता काबळे, सविता अष्टेकर, पराग अवजेकर, निखिल पाठक व समस्त नागरिक या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *