वर्धा : प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती ट्रस्ट, वर्धा द्वारा आयोजित प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेचे एकोणिसावे पुष्प शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, स्व. सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय, मगनवाडी, वर्धा येथे होणार आहे.
ही व्याख्यानमाला गेल्या २० वर्षापासून अविरतपणे आयोजित केली जात आहे. प्राचार्य दिनकरराव मेघे यांनी नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात तब्बल २३ वर्षापेक्षा अधिक काळ प्राचार्य म्हणून काम केले, या काळात त्यांनी विधी शाखेत ५ वर्षीय अभ्यासक्रम सुरू करून विधी शिक्षणाला नवी दिशा दिली.
ही व्याख्यानमाला नेहमीच सद्य:स्थितीतील ज्वलंत विषय घेऊन त्या विषयातील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन समाजाला देण्याचा प्रयत्न करत आली आहे.
वंदाच्या वर्षी सध्याच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत ज्वलंत असलेलाल ‘संविधान ते सताकारण – लोकशाहीचा कसोटीचा काळ’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी हे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवाग्राम आश्रमचे सचिव श्री. विजय तांबे हे राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व नागरिक, विचारवंत, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती ट्रस्ट, वर्धा चे सचिव डॉ अभ्युदय मेघे व ट्रस्ट च्या सर्व सदस्यांनी केले आहे.
