जाम पि. व्ही. टेक्सटाईल कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रामकृष्ण चौधरी बिनविरोध निवड

समुद्रपुर : तालुक्यातील जाम पि. व्ही. टेक्सटाईल कामगार सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी रामकृष्ण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. जाम पि. व्ही. टेक्सटाईल कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी निलाक्षी एस. माळी व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत रामकृष्ण लक्ष्मणराव चौधरी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी बाबा नथुजी सहारे व सचिव पदी सौ. जयश्री बंडू शंभरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक श्री शरद गारघाटे, श्री नरेंद्र गिरी, श्री रवींद्र दुरबुडे, श्री मनीष सुटे, श्री शैलेंद्र शेंडे, श्री सुनील कनपुरीया, अरविंद गुरफोडे, श्री शीलवंत मांडवे, श्री गुणवंता चामचोर, श्री सुनील पारधी, श्री संजय तांबसकर व सौ. वनिता घुगरे तसेच संस्थेचे व्यवस्थापक आशिष ठाकरे व निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *