वर्धा : आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी विशेष रकाना तयार करण्यात यावा, तसेच ओबीसी समाजाची जातनिहाय लोकसंख्या व सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीची अचूक माहिती अधिकृतरीत्या संकलित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज वर्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. डॉ. यशपाल भिंगे यांच्या मार्गदर्शनानुसार, मा. श्री. मोरेश्वर भाडे महाराष्ट्र सचिव यांच्या आदेशान्वये बाळाकृष्ण माऊस्कर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुनिलजी कोल्हे, राजेश राजूरकर ओबीसी सचिव महाराष्ट्र, महेश तेलरांधे प्रदेश उपाध्यक्ष, धरमपाल ताकसंडे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, नंदू कांबळे प्रदेश कार्यकारी सदस्य अनुसूचित जाती विभाग, रवी भुजाडे माजी सरपंच मांडवगड, विलास जवादे महासचिव अनुसूचित जाती विभाग, ऋतुजा भोयर, सागर सबाने जिल्हाध्यक्ष पंचायत राज, पंकज काचोले, वैभव सूर्यवंशी, बंटी खडसे, विनोद पांडे राष्ट्रवादी (अ), निलेश तिजारे तालुकाध्यक्ष, अशोक चौधरी, सारंग सबाने, सुरेश ठाकरे वर्धा शहराध्यक्ष, प्रभाकर धोटे सामाजिक कार्यकर्ते, मनोज देशमुख, सुभाष चांदोरे माजी उप सभापती वर्धा पंचायत समिती, किशोर चांदोरे, ॲड. नंदकुमार वानखेडे यांच्या उपस्थित मा. निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
ओबीसी समाज हा देशातील मोठा सामाजिक घटक असूनही जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र व अचूक लोकसंख्या नोंद उपलब्ध नसल्यामुळे विविध शासकीय धोरणे, आरक्षण, शैक्षणिक संधी, रोजगार, सामाजिक न्यायाच्या योजना तसेच विकासाच्या कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना ठेवून जातनिहाय व सामाजिक-आर्थिक माहितीचे अचूक संकलन करणे आवश्यक आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांच्यासह काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही मागणी जर मान्य नाही झाली तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आला.