राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी १० नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करावे असे अतुल वांदिले वर्धा जिल्ह्याध्यक्ष यांचे आवाहन केले. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीची रणनीती, बूथस्तरावरील संघटन, मतदार नोंदणी, जनसंपर्क अभियान, आणि स्थानिक प्रश्नांवर पक्षाने घेतलेली भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीसाठी सज्ज आहे.
येणाऱ्या निवडणुकीत आपण गावपातळीपासून जनतेचा विश्वास जिंकून एक मजबूत पर्याय म्हणून उभे राहू. प्रत्येक शहर व ग्रामीण भागात युवक व महिलांचे सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असून, कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घरोघरी पोहोचवावी, असे आवाहन केले. याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारी देऊन नियुक्तांची कार्यवाही सुसूत्रबद्ध करण्यात आली. अमोल बोरकर तर आभार प्रदर्शन प्रशांत भिलवले यांनी मानले.
यावेळी हिंगणघाट तालुका अध्यक्ष मिलिंद कोल्हेपूर, हिंगणघाट शहराध्यक्ष बाळू वानखेडे, सिंद्दीरेल्वे शहराध्यक्ष मंगेशवर कळमकर, समाजसेवक सुनील डोंगरे, माजी नगरसेविका आशिष देवतळे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, युवक प्रमुख प्रशांत लोभीकर, तालुका सरचिटणीस मिलिंद हिरेलेकर, संचालक गणेश वैरागडे, गजानन शेंडे, संजय लोभीकर, उपसरपंच मंगेश गिरडे, सुभाष चौधरी, अनिल देशमुख, माजी नगरसेवक बालाजी गहेलोत, अनिल आळणकर, माजी नगरसेवक राजेश भोयर, नामदेव राऊत, अविनाश बावरे, हरिजीवन यादव, युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कलोडे, प्रवीण श्रीवास्तव, किशोर गोणार, गजानन बोंडले, सुधाकर बाबई, विजय तांगडे,
तालुका उपाध्यक्ष विनोद भिलवले, आशिष देवतळे, सिंद्दी रेल्वे युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणकर, धनराज शेलप्पे, राहुल भोयर, तुषार घुटे, जाम साकळ प्रमुख रोशन खुडे, किसान सेल समुद्रपूर तालुका अध्यक्ष अंकित ढोकर, तालुका उपाध्यक्ष पंकज विहीरकर, तालुका उपाध्यक्ष राहुल भोयर, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष विनोद मिलमिले, संदीप चाफले, समाजसेविका शुभांगी डोंगरे, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा उपाध्यक्ष मीना सोनटक्के, युवक विधानसभा अध्यक्ष हुकेंश ढोकपांडे, ओबीसी शहर अध्यक्ष सुनील ठाकरे, यांच्यासह सर्व सेलचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.