मेडिकल चौकातील शिल्प आणि सौंदर्यीकरणाची देखरेख निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये विकासासह शिल्पे आणि सौंदर्यीकरणाची कामे सुद्धा करण्यात आली. यात मेडिकल चौकात चार कोपऱ्यांमध्ये खरपी दगडांच्या भिंती तयार करून हिरवळ, झुडपी झाडे लावण्यात आली. एका बाजूला गांधीजी कस्तुरबा आणि सहकारी अशी शिल्पे लावण्यात आली. तर अन्य कोपऱ्यात सुद्धा राष्ट्रीय नेत्यांचे शिल्प लावण्याचे काम सुरू आहे. पण यांची देखरेख नसल्याने दुरावस्था झाली. बकालपणा निर्माण होऊन समाजकंटक मद्य प्राशन तसेच बाजूला लघू शंका करीत असल्याने पावित्राला हरताळ फासल्या जात आहे.

याबाबत संबंधित यंत्रणेने आजपर्यंत कोणतीही दखल घेतल्याचे दिसून येते. राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पांची आणि सौंदर्यीकरणाची देखरेखच नसल्याने योग्य ती उपाययोजना करण्यात यावी या बाबत दिनांक १९ जानेवारी ला निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *