सुकळी स्टेशन जवळ खड्डा वाचवत घडला दूचाकी वाहनाचा अपघात: दोन जखमी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलु : हिंगणघाट कडून सुकळी स्टेशन मार्ग सेलू कडे येणाऱ्या MH ३२-Y १२८२ वाहन क्रमांकाच्या दुचाकी वाहन चालकाचे सुकळी येथील रेल्वे गेट जवळील खड्ड्यात गाडी उसळल्याने नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. सदर घटना ही आज रविवारचे सकाळी साडे अकरा बाराच्या सुमारास घडली.

हिंगणघाट वरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहनाने सुकळी स्टेशनच्या रेल्वे गेटजवळ असलेल्या खड्ड्याला वाचवत असताना नियंत्रण सुटले दोघेही खाली आपटले. यात प्रवास करत असलेले राम झाडे (३८) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर निलेश गिरी (२७) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. हे दोघेही हिंगणघाट चे रहिवासी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे हलविण्यात आले होते. परंतु राम झाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे व निलेश गिरी यांना देखील पायाला जबर दुखापत असल्यामुळे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार्थ सेवाग्राम येथे दाखल करण्याचे सांगितले. जवळ लटारे या रुग्णमित्राने वेळ न गमावता आपल्या रुग्णवाहिकेने तातडीने या दोघांना सेवाग्राम ईस्पितळात उपचार्थ दाखल केले. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अपघाताच्या बाबतीत अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *