बंद घरातून पितळी व तांब्याचे भांडे चोरणारी महिला व पुरुष आरोपी ताब्यात

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे-वर्धा : नमूद घटना ता वेळी व स्थळी यातील फिर्यादी नामे आदित्य अंशुलकुमार नारनोली वय ३० वर्षे रा. हिमालयविश्व वर्धा यांचे भामठीपुरा वर्धा येथील घरी कोणीतरी अज्ञात ईसमाने दिनांक २३/११/२०२५ ते २४/११/२०२५ चे रात्री दरम्यान त्याचे घराचे मागील दार तोडून घरात प्रवेश करून घरामधील पितळी व तांब्याचे भांडे इत्यादी एकूण किंमत ८६,४००/- रु चा माल चोरून नेले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो. स्टे. वर्धा शहर येथे अप. क्र. १६९३/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) भा. न्या. सं. अन्वये नोंद करण्यात आला असून तपासावर आहे.

सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडून खात्रीशीर मिळालेल्या माहिती वरून दिनांक २४/११/२०२५ रोजी अज्ञात महिला आरोपी नामे १) सौ. नंदनी करण मीटरकर वय २९ वर्ष १) सौ.रूपा संदीप मीटरकर वय १९ वर्ष ३) सौ. कलावती अर्जुन देऊळकर वय १९ वर्ष तिन्ही रा. गिड्डीखदान टेकडी बोरगांव मेघे वर्धा तसेच गुन्ह्यातील पितळी व तांब्याचे भांडे चोरून नेण्याकरीता वापरण्यात आलेला एक बजाज कंपनीचा ईलेक्ट्रिक ऑटो क्र. एम. एच. ३२ ए. के. २००५ चा चालक नामे आरोपी क्र ४) नदीम जमील सैय्यद वय २६ वर्ष रा. गिड्डीखदान टेकडी बोरगांव मेघे वर्धा यांना ताब्यात घेवुन पंचा समक्ष सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या पितळी व तांब्याचे भांडे किं. ८६,४०० तसेच एक जुना वापरता रेडमी कंपनीचा फिक्कट निळसर रंगाचा अँड्राईड मोबाईल किं. ₹ ५,०००/- रु तसेच पितळी व तांब्याचे भांडे चोरून नेण्याकरीता वापरण्यात आलेला एक बजाज कंपनीचा ईलेक्ट्रिक ऑटो क्र. एम. एच. ३२ ए. के. २००५ किंमत ₹ २,००,०००/- रुपये असा एकूण जुमला किंमत ₹ २,११,४००/- रुपयाचे माल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर सा. तसेच पो. नि. संतोषटाकले सा., यांचे निर्देशनानुसार पो. स्टे. वर्धा शहर येथील गुन्हेप्रगटीकरण पथकाचे पोउपनी शरद गायकवाड सा. पो. हवा. राजेश राठोड ब. क्र. ८७९, पो. अंमलदार राजेश डाळे ब. क्र. ९०८, सुरज जाधव व. क्र. १५८६, योगेश ब्राम्हण १६४१, मपोशी साक्षी चौधरी ब.नं. १३७१, मपोशी पुनम ठाकरे ब.नं. १५८५ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *