प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारेआर्वी : तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी चार आरोपीस गजाआड करत एका बालकास ताब्यात घेतले. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले असल्याने सांगण्यात आले.काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीतील संशयास्पद लक्षणे पाहून पुढील तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील वैद्यकीय अहवालात मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यावर कुटुंबीयांनी तातडीने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी जल्दगतीने कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.दरम्यान, आरोपींपैकी एक हा अज्ञान स्थितीत असून तो पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते. त्यांची कायदेशीर चौकशी संबंधित प्रक्रियेनुसार केली जात आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी कलम $४(१)(\text{ग}), ६(५), ७(२), ३४(\text{ए})$ डीएनए अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अटक आरोपींना पाच दिवसांचा पीसीआर मंजूर केला आहे. तपासावर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शन सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. पुढील तपास एसडीपीओ चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व पोलीस कर्मचारी करीत आहे.