जुनगड येथे विवाहित तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:सेलू : तालुक्यातील जुनगड येथे एका विवाहित तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. सचिन लक्ष्मणराव ठाकरे वय ३४ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता सुमारास मोठ्या भावाचा मुलगा जिन्यावर चढला असता खिडकीतून वाकून पाहिले असता गळफास घेतल्याचे आढळून आले. लागूनच आई-वडील, मोठा भाऊ राहत होता.

माहित होताच सर्वजण धावून आले तर सचिनची पत्नी ऑपरेशन झाल्यामुळे दोन लहान मुलींना घेवून माहेरी आरामासाठी गेली होती. त्यामुळे सचिन घरी एकटाच होता. त्याच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती जुनगडचे पोलीस पाटील सतीश कौरती यांनी सेलू पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण महाजन, सचिन उपाध्ये, मयुरी पाचांळ यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.

सचिनच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे. असंख्य नागरिकांच्या उपस्थित स्थानिक मोक्षधामावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *