समुद्रपूर : तालुक्यामधील शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात मागील ४ ते ५ महिन्यापासून वाघ व बिबट्याच्या वास्तव आहे. गिरड, खैरगाव, लहानपूर, सावरखेडा, पिंपळ, हिंबारा, सुकळी, वडगाव, पाईककामारी, सायगनगाव, बोडखा, राळेगाव, धोंडगाव, भावनपूर, हुसेनपूर, खुर्सापार, शिरपूर, डवळी, दौलतपूर, वायगाव हळद्या, वायगाव मोढ, बरबडी, खंडाळा, नारायणपूर, विरूळ, परसोडी, वर्धा, मेंढणखात, निरगुडी कवठी, कोरा, मांगरूळ, साखरा, धोडगाव, पिंपळगाव, ताडगाव, जोगिनगुंफा ई गावात वनविभागाने अजूनही बंदोबस्त केला नसून शेतकरी भीतीच्या छायेमध्ये आहेत. शेतकरी आपल्या शेतीत जाण्यास घाबरत आहेत, शेतीत कामाला मजूर मिळत नाही, शेळ्यापाकळ्या गायी बकऱ्या या फळस पाडत आहे. अगोदरच सोयाबीन, कपाशी चे हाल आहे त्यात तूर व चना च्या पिकाला ही माशागत निंदन खुरपण फवारण ई कामे करायला मजूर यायला तयार नसल्याने अतोनात नुकसान होत आहे.
शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याप्रमाणे परिसरात शेतकऱ्यांना सोलर कंपाऊंड निशुल्क करून देण्यात यावें व शेतीतील लाईने रात्रीची सुरु ठेवावी अशा आशयाचे निवेदन, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे डॉ. निलेशबाबू कोठारी युवा नेतृत्त्व रा का (अजित पवार गट) यांच्या नेतृत्वात निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना तहसलिदार समुद्रपूर यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर, खरेदी विक्री चे उपाध्यक्ष सुरेंद्रभाऊ कुळमेकर, मेहरधारणा पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र थोरात, नगरपंचायत चे गट नेते पिंटू थडाळे, शतीलाल गांधी मजदुरी उपध्यक्षा रा का पा, विनोद हरडे तहमेमत पाहुणे, अमर झाडे, अरुण बकाळे सचिन तुळणकर, गजानन पारखी, मोतीराम लोधीके, पंजाबराव वानखेडे, हरिभाऊ बोबले, अमित लवशुरकर, विनोदभाऊ पिसे, रामभाऊजी चौधरी, रामदास उमरेडकर, अमोलभाऊ सायटकर, शालिकाराव वैद्य जगणराव सुभटकर, योगदेवजी मुंगळ, अशोक लेळणे, वासुदेव भोयर, सुर्यराज खडसे, नितीन सरोदे, उमकाळजी डमारे, अभिालाप गिरडकर, पुरुषोत्तमजी सालवटकर, संदीप झाडे, सुरज फुलझले, ई शेतकरी नेते दिलेले उपस्थित होते.