वर्धा : स्थानिक निर्मल बेकरी चौक परिसरात विद्युत वितरण कंपनीच्या डीपीला अचानक आग लागली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काल महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविले. माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. येथे अग्निशामक विभागालाही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे वाहन काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखण्यात यश आले. महावितरण कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही हानी झाली नसून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. महावितरणकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.