प्रतिनिधी / दै.प्रतापगढे वारे_वर्धा : तळेगाव (श्याम. पं.) नजीकच्या चिखलापूर जवळ धडक दिली. नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवाई बसने रोड रोलरला मागावून जवळ धडक दिली. यामध्ये रोलरचे मोठे नुकसान झाले असून बस रोडच्या कडेला जाऊन पलटी झाली. यामध्ये बसचे सुद्धा नुकसान झाले. सदरची घटना बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडले.
प्राप्त माहितीनुसार अमरावती आगाराची शिवाई बस एम. एच. ४५ बी. झेड. ६८३६ अमरावती वरून नागपूरला ३३ प्रवासी घेऊन जात होती. तर रोलर चिखलूर वरून तळेगावकडे आपल्या दिशेने जात होते. चिखलूर बस स्थानकापासून काही अंतरावर मागावून येणाऱ्या शिवाई बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे रोलरला मागावून जोरदार धडक दिली.
यामध्ये रोलरचे समोरील चाक तुटून रोलरचे इंजिन वळकुणाव झाले. यामध्ये रोलरचा चालक श्रीकृष्ण दौलतराव उईके वय ४७ व. आरटी हे गंभीर जखमी झाले. तर बस रोडच्या डाव्या कडेला जाऊन झाडाला धडकून कोल्हांडल्याने यामध्ये चालक सुरज गजानन पोटे वय ३० व. दर्यापूर, वाहक अशोक किसनराव बोरकर वय ५४ व. अमरावती यांचे सह १६ प्रवासी जखमी झाले.
जखमी सर्व प्रवाशांना पोलीस व नागरिकांच्या मदतीने तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व प्रवाशांवर प्रथमोपचार करून काहींना सुट्टी देण्यात आली. तर चार प्रवाशांना आणि तर एका महिला प्रवाशाला अमरावती येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. सदर घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खिलेंद्र खडस, राजेश जयसिंगपूर, अतुल अडसड, निखिल मडसे, ट्रॅफिक पोलीस, रणजीत बागडे हे करीत आहे.