लोक जन पार्टी (रामविलास) चा शिवसेना उमेदवार रविकांत बाळपांडे यांना पाठिंबा जाहीर

प्रतिनिधी / दै. प्रतापगङचे वारे: वर्धा : लोक जन पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय सचिव (किसान प्रकोष्ठ) प्रकाश कांबळे यांनी वर्धा नगर अध्यक्ष पदाचे शिवसेना उमेदवार रविकांत बाळपांडे व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला। दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रकाश कांबळे यांनी निवडणूक प्रचार कार्यालयात शिवसेनेच्या उपनेत्या तसेच मुख्य प्रवक्ता आमदार मनिषाताई कायंदे यांची भेट घेतली।

यावेळी त्यांचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। लोक जन पार्टी (रामविलास) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजना राज्यातील जनतेत हित जोपासणाऱ्या ठरत आहेत। तसेच रविकांत बाळपांडे यांचा राजकीय अनुभव तसेच दूरदृष्टीची कार्यक्रमात असल्याने वर्धा शहराचा विकासासाठी पाठिंबा जाहीर करत असल्याचे प्रकाश कांबळे यांनी सांगितले। यावेळी आमदार मनिषाताई कायंदे यांना पाठिंब्याचे पत्र देऊन शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बाळपांडे सहित शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। प्रसंगी लोकसंपर्क प्रमुख राज दीक्षित, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बाळपांडे उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *