प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारेवर्धा : वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबवली असून, दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी स्था.गु.शा. वर्धा चे अँटी नारकोटिक्स पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा मदनी वार्ड नं. ०२ प्राथमिक शाळेमागे येथे सराईत गुन्हेगार शंकर गुलाब पवार याचे राहते घरी एन.डी.पी.स. व दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी शंकर पवार याची पत्नी सौ. चंदा शंकर पवार, त्याची अल्पवयीन मुलगी व त्याचा भाऊ राजु गुलाब पवार असे संगणमताने गांजा व दारू मालाची विक्री करतांना मोक्कावर रंगेहात मिळून आल्याने, तसेच झडती दरम्यान त्याचे घरी गांजा व दारूचा माल, मालाची विक्री व वाहतूक करण्याकरिता वापरलेली मोपेड, अवैध मार्गाने प्राप्त केलेली नगदी रक्कम मिळून आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपींचे ताबाटुन निव्वळ ५५१ ग्रॅम गांजा अमली पदार्थ, देशी- विदेशी व मोहा दारूचा माल, एक सुझुकी बर्गमन मोपेड क्र. एम.एच. ३२ बी.ए. ७६६०, नगदी रक्कम, दोन मोबाईलसह जु.कि. १,९७,२७५ रू चा मुद्देमाल जप्त करून एकुण ०४ आरोपीविरुद्ध पो.स्टे. सेवाग्राम येथे एन.डी.पी.एस. व दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सिनुकुमार बानोट, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोलकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक, पल्लवी बोबडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.