सारंग श्यामबाबू पाटील यांचे हृदयविकाराने निधन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : रामनगर चौक, वर्धा येथील रहिवासी सारंग श्यामबाबू पाटील (वय ५१) यांचे काल ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज ९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानातून काढण्यात आली. कामगार नेते स्व. श्यामबाबू पाटील यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होते. तसेच दैनिक श्रमिक संघर्ष वृत्तपत्राचे संपादक दिनेश (चारुभाऊ) पाटील यांचे ते लहान भाऊ होते. सारंग पाटील यांच्या निधनाने रामनगर परिसरात तसेच परिचित वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *