शेतकरी कर्जमाफीच्या कथित फसव्या शासन निर्णयाविरोधात वर्धेत विविध संघटना आक्रमक

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले धरणे आंदोलन

वर्धा : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेविरोधात वर्धेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, या शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज विविध संघटना आक्रमक झाल्या असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील शेतकरी कर्जमाफी जीआरची होळी करून धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. या निर्णयातील अटी, पात्रतेचे निकष तसेच प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांवर होणारा परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी हा शासन निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांना न्याय देणारा नसून अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणारा असल्याचे भावना व्यक्त करीत योजना अपुरी, दिशाभूल करणारी व शेतकरी हिताला बाधक असल्याचे सांगत या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यात किसान अधिकार अभियानाचे प्रेरक अविनाश काकडे, काँग्रेस यशवंत झाडे, काँग्रेसचे नेते अभ्युदय मेघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, आरपीआयचे महेंद्र मुनेश्वर, किसान अधिकार अभियानाचे संजय काकडे सह मोठ्या संख्येने शेतकरी विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या आंदोलनादरम्यान शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या वेळी किसान अधिकार अभियानाचे मुख्य प्रेरक अँड. अविनाश काकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य उपाध्यक्ष यशवंतराव झाडे, किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, वर्धा शहर नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, तालुकाध्यक्ष धैर्यशील जगताप, राजीव वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, संदीप कीटे, विनोद पांडे, प्रशांत भगत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर, जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण भोयर, किसान अधिकार अभियानाचे संघटक गोपाल दुधाने, तसेच मंगेश शेंडे, काँग्रेस सुनील घीमे, काँग्रेस शाम भेंडे, प्रविण कांबळे, विजय नरांजे, चुडामन घवघवे, अनंत झाडे, संजय भगत आणि संजय जवादे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *