प्रज्योत ग्रुपच्यावतीने सेवाग्राम मेडिकल चौकात तथागत गौतम बुद्ध जयंती उत्सव साजरा

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त प्रज्योत ग्रुपच्यावतीने शनिवारी बुद्ध पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीत विशारद प्रदिप लोखंडे, प्रशांत लोखंडे, शुभांगी पाटील यांनी करुणामय बुद्धवाणी व भिमवाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज गजभिये, कवडूजी ठेंगरे, मुन्ना गोसावी, सुशिल बलविर, सुनिल करवे, अमर भालशंकर, राजू गुडे, उमेश गुडे, दयाशंकर बेले, मंगेश मून, प्रफुल गुरनुले, विनोद वानखेडे, विनोद पाटील, दिपक भोंगाडे, सचिन भालशंकर, निखिल बलविर, माणिक नागदेवते कार्यक्रमाच्या प्रारंभी पुजापाठ करण्यात आले. संचालन व आभार कांबळे गुरुजी यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *